अभिनवमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थांसाठी लंगडी सारख्या पारंपारिक क्रीडा प्रकराबरोबरच व्हॉलीबॉल, डॉजबॉल व इतर अनेक सांघिक खेळ घेण्यात आले. या सांघिक स्पर्धेत व्हॉलीबॉल या खेळात येल्लो हाऊस ने विजेतेपद पटकावले. या सांघिक स्पर्धांमध्ये अधिक रंगत आणली त्या पारंपारीक लंगडी स्पर्धेने, या स्पर्धेत मुलांमध्ये यल्लो हाऊस तर मुलींमध्ये रेड हाऊस विजयी झाले. कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्राचार्या वर्षा शर्मा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगून मन व शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मैदानावरील खेळ खेळणे अत्यंत गरजेचे आहे, असे म्हणाल्या.

क्रीडा विभागप्रमुख शुभांगी तपासे, राजेंद्र वांजळे, शुभांगी शेलार, वैशाली कांटे, सौरभ गावडे या क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप ,प्राचार्या वर्षा शर्मा , माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका धनश्री खरे , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे , शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रशांत शिंदे यांनी केले.