मानसिक एकाग्रता अंगी बनवण्यासाठी योगाभ्यास करणे अत्यंत गरजेचे

मानसिक एकाग्रता अंगी बनवण्यासाठी योगाभ्यास करणे अत्यंत गरजेचे!

– राजीव जगताप

शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक अडथळे दूर करून एकाग्रता अंगी बनवण्यासाठी योगाभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे,असे प्रतिपादन अभिनव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांनी केले.

आंबेगाव बु येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि जुनिअर कॉलेजमध्ये पूर्व प्राथमिक विभागा पासून जुनिअर कॉलेजपर्यंतच्या जवळजवळ 2590 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत योगा डे उत्साहात साजरा करण्यात आला.

राजीव जगताप म्हणाले कि, शरीराला सुदृढ बनवण्यासाठी योगासन आणि प्राणायाम आवश्यक आहे.तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक आजारांवरील रोगप्रतिबंधक लस आहे.जगातील सर्वात तरुणसंख्या असलेला भारत देश निरोगी होण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकाने दिवसातील काही वेळ योगाभ्यासासाठी देण्याची गरज व्यक्त केली.योगा डे साजरा करताना आम्ही अभिनवचे सर्व विद्यार्थी नक्कीच दैनंदिन जीवनात आमची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी योग प्रात्यक्षिके करू अशी भावना व्यक्त केली.

आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे आज आमच्यासारख्या तरुणांना योगदिनानिमित्त मार्गदर्शन आणि जीवनातील योगाचे महत्व्व पटल्यामुळे बिघडलेले संतुलन सावरून सक्षम व्यक्तिमत्व बनण्यासाठी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळाल्याची एन एन एस विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे आयोजन सर्व क्रीडा शिक्षकांच्या आणि इतर शिक्षकांच्या साहाय्याने केले.अष्टांग आयुर्वेद च्या नूतन कुलकर्णी यांनी लाइव्ह विविध योग प्रात्यक्षिकासंबंधी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या आणि विद्यार्थ्यांनी अनुकरण केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप ,सेक्रेटरी सुनीता जगताप,सहसेक्रेटरी निर्मोही जगताप ,प्राचार्या वर्षा शर्मा,उपस्थित होते.