अभिनवच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा

गेली १६ वर्षे एन एस एस चे विद्यार्थी करताहेत फटाके न वाजवण्यासंबंधी जनजागृती
                           दिवाळीमध्ये फटाके वाजवताना दिसणारा प्रकाश न पाहता दिव्याच्या ज्योतींचा लखलखता प्रकाश अनुभवण्यासाठी अभिनवच्या एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली.आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एन एस एस विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे याहि वर्षी सलग १६ वर्षे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी जनजागृती केली.
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक राजीव जगताप म्हणाले कि,फटाके वाजवल्यामुळे दिवाळीमध्ये सर्वात जास्त प्रदूषण होते,त्यामुळे गंभीर आजारांना निमंत्रण मिळते .अशा विघातक दुष्परिणामांमुळे सर्व विद्यार्थ्यांनी दक्ष राहिले पाहिजे.नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेतली पाहिजे.दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याची संकल्पना समाजामध्ये रुजवली तर एक दिवस खरोखरच फटाकेमुक्त दिवाळी साजरी होईल .
                               फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी अनुभव व्यक्त करताना हर्षदा जाधव आणि नंदिनी शर्मा या विद्यार्थिनी म्हणाल्या की “फटाके जाळणे म्हणजे पैशाची राख धूर आणि प्रदूषण करणे होय त्यापेक्षा तेच पैसे गरजू व्यक्तीला ,अनाथ आश्रमातील किंवा वृद्धाश्रमातील व्यक्तीला दिल्यास त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य म्हणजेच खरी दिवाळी साजरी करणे हे होय,” त्याचबरोबर शिल्लक राहिलेला दिवाळीचा फराळ वाया न घालवता गरीब आणि अनाथ लोकांना देण्यासंबंधी आवाहन करून ज्यांना कधीच दिवाळी माहिती नाही अशा अनाथ मुलांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी विनंती केली.
                              कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप ,सेक्रेटरी सुनीता जगताप ,सहसेक्रेटरी निर्मोही जगताप,प्राचार्या वर्षा शर्मा यांनी उपक्रमाचे कौतुक केले.