अभिनवमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात अवघे गरजे पंढरपूर

अभिनवमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात अवघे गरजे पंढरपूर अशोक बालगुडे पुणे, दि. २८ ः विद्याथ्यांनी स्वतः बनवलेली आणि फुलांनी सजवलेली माऊलीची पालखी… पारंपरिक पोशाख… हाती भगव्या पताका घेऊन आणि आनंदाचे डोही आनंद तरंग… अवघे गरजे पंढरपूर… अभंगाचा नाद दुमदुमला. आंबेगाव बु || येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक राजीव जगताप, सचिव सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप, निहारिका जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या सचिव सुनीता जगताप आणि प्राचार्या वर्षा शर्मा यांच्या हस्ते पांडुरंगाची पाद्यपूजा आणि माउलींची आरती झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग, भक्तिगीते आणि नृत्ये सादर केली. संगीत विभागप्रमुख बिपीन इथापे, संगीत शिक्षक आनंद चोरघे, सिद्धेश भोयार यांनी संगीत सादर केले. अक्षरा वरघडे आणि हर्षवर्धन बेनकर या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.