अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एन एस एस विभागातर्फे २६/११ मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर बांधवाना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांना कंठस्नान घालता घालता आपला जीव गमावणाऱ्या शहिदांना पुष्पांजली अर्पण करून भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वार्थाने झटण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा तन्वी कंक,नंदिनी शर्मा,हर्षदा जाधव,राज पवार,श्रीपती पाटील या एन एन एस स्वयंसेवकांनी केली.
राजीव जगताप यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबध्द राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.या वेळी कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांनी संविधानाचे वाचन केले.
       पर्यवेक्षिका सुनीता यादव आणि सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एन एस एस स्वयंसेवकांच्या सहकार्याने उपक्रम राबवला. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप ,सेक्रेटरी सुनीता जगताप, एडवोकेट दिलीप जगताप,सहसेक्रेटरी निर्मोही जगताप,समन्वयक डॉक्टर सविता शिंदे,प्राचार्या वर्षा शर्मा उपस्थित होते
 *फोटो ओळ :अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप , निर्मोही जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा,कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे उपस्थित होते*