अभिनवमध्ये स्कूल मध्ये”अभिनव भक्तीरंग”मधून विद्यार्थ्यांनी सादर केला भक्तिरसाचा सोहळा.
अभिनवमध्ये स्कूल मध्ये
“अभिनव भक्तीरंग”मधून विद्यार्थ्यांनी सादर केला भक्तिरसाचा सोहळा.
विद्याथ्यांनी स्वतः बनवलेली आणि फुलांनी सजवलेली माऊलीची पालखी.. पारंपरिक पोशाख..हाती भगव्या पताका घेऊन “जय जय राम कृष्ण हरी” निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम”असा अखंड विठूनामाचा, संत नामाचा गजर करत भक्तिमय वातावरणात आंबेगाव येथील अभिनवच्या संकुलामध्ये *पालखी सोहळा* साजरा केला.
आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या उपस्थितीत हरिनामाच्या जयघोषात अभिनव चा परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात सेक्रेटरी सुनीता जगताप आणि प्राचार्या वर्षा शर्मा यांच्या हस्ते आणि चिमुकल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पांडुरंगाची पाद्यपूजा करून विठू माउलींच्या आरतीने झाली. यावेळी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थिनींनी “माऊली माऊली “या गीतावर पर्जन्य सरींच्या वर्षावात बहारदार नृत्य सादर केले. .संगीत विभागाच्या गायन वादनातील निपुण विद्यार्थ्यांनी विविध अभंग ,भक्तिगीते, गवळणी सादर करून भक्तिभावाने विठूमाऊलीला साद घातली. ज्ञानदा कुलकर्णी आराध्य रावळ रुद्र पाटसकर, रुद्रा मांढरे या गायक वृंदांनी सादर केलेल्या “निजरूप दाखवा हो, , जगी जीवनाचे सार, देव माझा विठू सावळा…”या अभंगाला उपस्थित विद्यार्थ्यांनी,पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला तर आराध्य रावळ यांनी गायलेला ‘देह विठ्ठल विठ्ठल झाला’ या भक्तीगीताने कार्यक्रमाला बहार आणली. अभिनव भक्तीरंग”साठी संगीत विभाग प्रमुख बिपीन इथापे, संगीत शिक्षक सिद्धेश भोयार आणिअस्मित चव्हाण यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरा वरघडे, देवांशी बुगड,श्रुती जाधव व आकांक्षा गुंड या विद्यार्थ्यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.अभिनव स्कूलने आयोजित केलेल्या आगळ्या वेगळ्या पालखी सोहळ्याचे उपस्थित सर्व पालकांनी भरभरून कौतुक केले,यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप,उपाध्यक्ष संजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, सहसचिव निर्मोही जगताप,समन्वयक डॉ.सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे , पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित