


अभिनव शाळेच्या चिमुकल्यांची गणपती बाप्पाने केले स्वागत
पहिली ते सातवीच्या वर्गासाठी प्रवेशोत्सव आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मधील प्राथमिक विभागांच्या चिमुकल्यांचे साक्षात गणपती बाप्पाच्या वेशात असलेल्या स्वरा सुधाकर पवार हिने स्वागत केले गणपती बाप्पाने गेटवरून विद्यार्थ्यांना हाताला धरून शाळे मध्ये नेऊन उत्साहात प्रवेशोत्सव साजरा केला. यावेळी चिमुकल्यांचे औक्षण करून सर्व शिक्षकांनी भरभरून आशीर्वाद दिले त्याच बरोबर ज्युनिअर कॉलेजच्या एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत केले तर विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या भावाला आशीर्वाद देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क चे वाटप केले तर काही विद्यार्थ्यांनी sanitizer ची बॉटल ची आणि मास्क ची प्रतिकृती तयार करून ते वापरणे संबंधी जनजागृती केली. पालकांनी या आगळ्यावेगळ्या स्वागताचे भरभरून स्वागत केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांनी चिमुकल्यांना आशीर्वाद शुभेच्छा दिल्या आणि कोरोना आणि नुकत्याच आलेल्या ओमिकॉन लवकरात लवकर नाहीसा व्हावा,आणि शाळेमध्ये खंड पडू नये म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना केली.साक्षी साळुंके,आणि अनुष्का परदेशी या एन एस एस विद्यार्थिनींनी ही आज पाहिलेले चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य असेच नेहमी निदर्शनास पडावे आणि कोरोना कायमचा नाहीसा व्हावा यासाठी गणपती बाप्पाला साकडे घातले.हा उपक्रम कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांच्या आणि एनएसएस विभागाचे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबवला.यावेळी संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सचिव सुनीता जगताप,सहसचिव निर्मोही जगताप,एडवोकेट दिलीप जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे उपस्थित होते.