अभिनव स्कूल मध्ये लसीकरण मोहीम

अभिनव स्कूल मध्ये लसीकरण मोहीम
आंबेगाव येथील संकुलात १६४ विद्यार्थ्यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस
अभिनव एज्युकेशन सोसायटी च्या इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिन लसीकरण मोहीम पालकांच्या भरघोस प्रतिसादा सह यशस्वी रित्या राबविण्यात आली.यावेळी शाळेतील १६४ विद्यार्थ्यांनी लसीकरण केले..लसिकरणासाठी पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि जिविका हेल्थकेअर यांच्या सहकार्याने आरोग्य केंद्रातील डॉ.दीप्ती राजकुमार पिंपळे, विशाल उल्हाळकर, पारस साक्रे, किरण पवार, साहेबराव बंदुके, सुरेश पाटोळे यांनी बहुमूल्य सहकार्य केले.
यावेळी डॉ.दीप्ती पिंपळे यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाला दूर ठेवण्यासाठी घ्यावयाच्या दक्षता त्याचबरोबर दैनंदिन आरोग्य सुदृढ कसे ठेवावे याविषयी मार्गदर्शन केले. एन एस एस विद्यार्थिनी अनुष्का परदेशी, सिद्धी नांगरे, श्रींगार पवार, त्याचबरोबर सर्व पालकांनी ही शाळेने विद्यार्थ्यांसाठी केलेल्या लसीकरण मोहिमेचे तोंड भरून कौतुक केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
श्री.राजीव जगताप, सचिव सौ.सुनिता जगताप, निर्मोही जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा, कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते. एन एस एस स्वयंसेवक आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला.

फोटो ओळ. आंबेगाव येथील अभिनव स्कूल मध्ये १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिन लसीकरण मोहीम राबवली.