अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक

अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल च्या ग्रीन हाऊस ने पटकावला २०२३ चा सांघिक करंडक

सी.बी.एस. ई. स्कूल चा वार्षिक क्रीडादिन साजरा
  आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या सी बी एस ई विभागाचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.अभिनव सी.बी.एस. ई. स्कूल विभागाच्या ग्रीन हाऊस ने २०२३ चा सांघिक करंडक पटकावला.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला या क्रीडा दिनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे साखरे उपस्थित होत्या,यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप,सेक्रेटरी सुनीता जगताप,खजिनदार ध्रुव जगताप,सह सेक्रेटरी निर्मोही जगताप, प्राचार्या वर्षा शर्मा , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे मॅडम,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी .पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           क्रीडा दिनाची सुरवात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्रीडाज्योत आणून प्रमुख पाहुण्यांना देऊन मान्यवरांनी क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून करण्यात आली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ संचलनातून मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी प्राथमिक,आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या.प्राथमिक आणि माध्यमिक विभागाने मल्लखांबावरील चित्तथरारक क्रीडाप्रकाराची प्रात्यक्षिके दाखवली,त्याचबरोबर रिले रेस, धावणे, बॉल पासिंग,अडथळा शर्यत, रोप मल्लखांब, विद्यार्थिनी च्या स्वसंरक्षनसाठी लाठी काठी इत्यादी क्रीडा प्रकारामधून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सर्व एडवेंचर ऍक्टिव्हिटीसाठी पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.क्रीडा प्रकारामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई निवंगुणे,रोशन पांचाळ, वैदेही रिषी,प्रीती लोकरे यांनी केले.आभार हेडगर्ल परिक्षिता मेमाणे हिने मानले.क्रीडा विभाग प्रमुख शुभांगी तपासे,यांच्याबरोबरच,वैशाली कांटे,शुभांगी शेलार,प्रशांत शिंदे,राजेंद्र वांजळे,सौरभ गावडे या क्रीडा शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने क्रीडा दीन साजरा करण्यात