जैविक शेती.

By Abhinav School

जैविक शेती ही नैसर्गिक पदधतीने केली जाते तसेच ही शेती सेंद्रीय खतापासून केली जाते. सेंद्रिय खत हे शेण‚ गेामुत्र‚ पिकांचा अवशेष‚ पाचोळा, कुठलेही पीक घेतल्यानंतर मागे जे काही उरलेले असेल ते म्हणजे पान‚ खेाड‚ भुस्सा‚ गवत‚ जनावरांची विष्ठा इ. कुजवून जे खत तयार केले जाते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. इंग्रजीत याला कंपोस्ट खत असेही म्हणतात.

या अशा संपूर्ण नैसर्गिक गोष्टींचा वापर करून हे सेंद्रिय खत बनविले जाते. या खताचा वापर जैविक शेती करण्यासाठी होतो. कोणतेही रासायनिक पदार्थ किंवा रसायनांमुळे माती खराब होते त्यातील पोषक घटक कमी होतात आणि पिकांची वाढ खुंटते अथवा त्यासाठी पौष्टीकपणा कमी किंवा नाहीसा होतो. यासाठी संपूर्ण नैसर्गिक पदधतीने केलेली शेती ही खरच काळाची गरज असणार आहे.रसायने हे एक प्रकारचे विषच आहे.

वेगवेगळ्या रासायनिक खतांमुळे त्रासदायक संप्रेरक‚ हानीकारक डि एन ए, दाहक मेदयुक्त असे त्रास होऊ शकतात तसेच कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तरीही अशी रसायने खूप दूर पर्यंत आढळून येतात. आणि अशाच रासायनिक खतामुळे अलर्जी सारखे आजार देखिल होऊ शकतात जर सेंद्रिय शेती बरोबर तुलना केली तर रासायनिक खतांमुळे आपल्याला श्वासोच्छवासाचा त्रास, दमा‚ घसा दुखणे, खेाकला या सारखे आजार देखिल होऊ शकतात.

करिअरच्या दॄष्टीने कृषी क्षेत्र हे एक खुप चांगले स्रोत आहे.तसेच उदयोग व रोजगार या साठी हे क्षेत्र देशात चांगले आहे.

भारताच्या अर्थ व्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राची भूमिका अतिशय महत्वाची आहे. देशातील अधिकाधिक विद्यार्थी या क्षेत्राला आपले करिअर म्हणून निवडत आहेत. ही खूप नाविण्यपूर्ण प्रक्रिया आहे. शहरी भागात टेरेसवर देखिल शेती केली जाते.

शाळेत हा प्रकल्प मागील दोन महिन्यांपासून चालू केला आहे. त्यामध्ये भाज्या समाविष्ठ आहे तसेच फळ भाज्यादेखिल आहेत.टेरेस फार्मिंग मध्ये मेथी‚ फ्लॉवर लिंबू‚ मिरची या भाज्या व फळ भाज्या आहेत. यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते.झाडांची काळजी घेण्यासाठी व निगा राखण्यासाठी रोज वेगवेगळ्या इयत्तेचे वर्ग येऊन झाडांना पाणी देतात. टेरेस फार्मिंगला भेट देतात. ते त्यांच्या बरोबर तेथे वेळ घालवतात तसेच त्याचे निरिक्षणही करतात.त्यांची होणारी वाढ, बदल त्यांचे देखिल निरिक्षण करतात हेच समर्पण, सहभाग या प्रकल्पात बघून संभाव्यता आहे की त्यांचे मन आनंदी व निरोगी राहील आणि हाच प्रकल्प अजून आम्ही काही प्रमाणात वाढविणार आहोत.