गुढी पाडव्यानिमित्त केले एन एस एस विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे पूजन

अभिनव मध्ये मातृ पितृ पूजन
गुढी पाडव्यानिमित्त केले एन एस एस विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे पूजन
आंबेगाव येथील अभिनव ज्युनिअर कॉलेज मधील एन एस एस विभागाने गुढी पाडव्यानिमित्त मातृ पितृ पूजन हा स्तुत्य उपक्रम राबवला.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे औक्षण करून पूजन करण्यात आले.आई वडिलांनी ही विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले.पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी सचिन घाडगे ,ज्योती तानाजी साळुंके,आणि कल्पना प्रशांत वाळके या पालकांनी कॉलेज मध्ये आयोजित केलेल्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक कॉलेज मध्ये सातत्याने आयोजित करून पालकांचे आशीर्वाद घ्यावेत आणि त्याचबरोबर शिक्षक हेच दुसरे पालक आहेत.अभिनव मधील शिक्षकांचे आणि येथील अभिनव उपक्रमाचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहे.एन एस एस विद्यार्थीनी श्रावणी रणसुबे,सिद्धी नांगरे यांनीही अशा प्रकारचे उपक्रम पहिल्यांदाच शाळेत अनुभवत आहोत .त्याचबरोबर पालकांना आणि शिक्षकांना उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण होण्याची ग्वाही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने दिली.प्राचार्या वर्षा शर्मा ,पर्यवेक्षिका सुनीता यादव,आणि कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे आणि सर्व शिक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.संस्थेचे संस्थापक राजीव जगताप,सचिव सुनीता जगताप सहसचिव निर्मोही जगताप यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.